नेवासा स्ट्राइक : सकल मराठा समाजाचा नेवासा फाटा येथे रास्ता रोको

    130

    नेवासा : जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आक्रोश मोर्चावर (jalna Maratha Strike) झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा नेवासा (Newasa) शाखेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन (Rasta Rokoकरण्यात आले आहे. नेवासा फाटा येथे छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावर सोमवार (ता.४) रोजी सकाळी १० वाजता करण्यात आलेल्या रास्ता रोकोला मराठा समाजाबरोबरच सर्व जातीधर्मांच्या नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे. 

    या रास्ता रोको प्रसंगी माजी आमदार पांडूरंग अभंग, राष्ट्रवादी कॉग्रेसचे दादा गंडाळ, शिवसेनेचे बालेंद्र पोतदार, सुदाम कापसे,अॅड.बन्सी सातपुते,गणेश निमसे, रावसाहेब घुमरे,गणेश चौगुले, पी.आर.जाधव,कमलेश नवले,गणेश झगरे यांच्यासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी आंदोलनाप्रसंगी समयोचित भाषणे केली.

    हे रास्ता रोको आंदोलन सुमारे एक तास सुरु असल्यामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून  वाहतूक खोळंबली होती. झालेल्या आंदोलनानंतर वाहतूक सुरुळीत करण्यासाठी पोलीसांनी विशेष परिश्रम घेतले.  नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला. 

    या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे रावसाहेब घुमरे, गणेश निमसे,प्रदिप आरगडे,शुभम आरगडे,छञपती युवा सेनेचे नरेंद्र नवथर,सागर नवथर,संकेत आरगडे,अरविंद आरगडे,स्वप्निल गरड,अनिल तारे,शिवसेनेचे नारायण लष्करे,शिवसेनेचे शाखाप्रमुख गणेश झगरे,पी आर जाधव,गणेश चौगुले,विजय गाडे, बाळासाहेब माटे,कल्याण आगळे,गणेश आगळे,भारत हापसे,गणेश घुले,आशिष घुले,बालेन्द्र पोतदार,सुदाम कापसे,बन्सी सातपुते,मुन्ना चक्रनारायण,धनंजय काळे,राजू काळे,निरज नागरे,माऊली देवकाते,सतीश निपुंगे,नितीन आडसुरे,संदेश काळे,सचिन नागपूरे, सोमनाथ गायकवाड,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दादासाहेब गंडाळ यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here