नीना गुप्ता यांचा ‘हाच’ तो व्हिडीओ social media वर व्हायरल होत आहे

813

आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या नजरा स्क्रीनवर खिळवून ठेवणारी दर्जेदार अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. नीना गुप्ता या बऱ्याच काळापासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्या सोशल मीडियावर त्याच्या कामाबद्दल, खासगी आयुष्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी फॅन्ससोबत शेअर करत असतात. इन्स्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

https://www.instagram.com/p/CS2jcACCfYA/?utm_source=ig_web_button_share_sheet

नीना गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्या ‘कोका कोला’ या गाण्यावर एक रशियन डान्सरसोबत डान्स करताना दिसत आहेत. यात निना यांनी पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. त्यांचा हा बोल्ड लूक आणि डान्स चाहत्यांना आवडत आहे. ते कमेंट करत प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. नीना यांनी हा व्हिडीओला “और अब रूप परिवर्तन” असे कॅप्शन दिले आहे.

नीना गुप्ताच्या या बोल्ड लूक आणि डान्सने नेटकाऱ्यांना वेड लावले आहे. याआधी देखली नीना यांनी अनेकदा फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यांचा एक जुना व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. तो दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘यात्रा’ या (१९८६) मिनी सीरिजचा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here