निवडणूक लढवण्याबाबत मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही” मावळते डीजीपी गुप्तेश्वर पांडे

    805

    “निवडणूक लढवण्याबाबत मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही” मावळते डीजीपी गुप्तेश्वर पांडे

    मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दलमध्ये बिहारचे मावळते डीजीपी गुप्तेश्वर पांडे प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमांवर सर्वत्र झळकत असताना, या पार्श्वभूमीवरच खुद्द गुप्तेश्वर पांडे यांनी एक खुलासा केल्याचे समोर आले आहे. निडणूक लढवण्याबाबत मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे.गुप्तेश्वर पांडे यांना माध्यम प्रतिनिधींनी गराडा घातला व राजकीय पदार्पणासह आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत विचारले. तसेच, यासाठीच तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला आला आहात का? ही देखील विचारणा करण्यात आली. या सर्व प्रश्नांवर पांडे यांनी खुलासा केला.“मी या ठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटायला आणि डीजीपी म्हणून माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य दिल्याने त्यांचे आभार व्यक्त करण्यास आलो आहे. निवडणूक लढवण्याबाबत मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.” असं गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं असल्याचं एएनआयने दिलं आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here