निर्माणाधीन असणारा उड्डाणपुलाचा एक भाग कोसळला: कार मधील फॅमिली थोडक्यात बचावली

काम सुरु असणारा उड्डाणपुलाचा भाग कोसळला, कार मधील फॅमिली थोडक्यात बचावली,

20 ऑक्टोबर 2021 :– समाजात अनेक दुर्घटना घडतात. मागील काही दिवसांत आगीसारख्या अनेक दुर्घटना घडल्या.आता आणखी एका दुर्घटनेचे वृत्त आले आहे. उड्डाणपुलाच्या काही भाग कोसळला आहे.नागपूरच्या कळमना परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निर्माणाधीन असणारा हा उड्डाणपुलाचा एक भाग कोसळला आहे. सुदैवाने ही दुर्घटना घडली त्यावेळी उड्डाणपुलाचे कामकाज बंद होते. यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार कळमना मार्केटकडे जाणाऱ्या भारतनगर चौकात ही दुर्घटना घडली.दरम्यान यावेळी एक कुटुंब बालंबाल बचावले. पुल पडण्याच्या वेळी अवघ्या सेकंदाच्या फरकाने तेथून हे कुटुंब आपल्या कार मधून गेले होते. मुळे हे कुटूंबीय थोडक्यात या दुर्घटनेतून बचावले असंच म्हणता येईल. त्याचबरोबर निर्माणाधीन पुल कोसळल्याने विरोधी पक्षाकडून नितीन गडकरी आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान ही घटना कशी घडली याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या पुलाच्या पिल्लरवर स्पॅन बेअरींग करण्यासाठी त्याला उचलण्यात येत होतं. त्यावेळी स्पॅन घसरून ही घटना घडली.पण सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याने चिंता काही प्रमाणात कमी व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेनंतर नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह नागपूर महानगरपालिकेचे अनेक पदाधिकारी पोहोचले.दुर्घटनेची तांत्रिक दृष्टिकोनातून तज्ञांकडून चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरोधात कारवाई करू अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली आहे.<

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here