निकृष्ट कामे, इतर शासकीय कामातील अनियमितता व अनागोंदीच्या निषेधार्थअन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे 6 डिसेंबरला आमरण उपोषणअहमदनगर(प्रतिनिधी)- पारनेर व नगर तालुक्यात झालेले रस्त्यांचे निकृष्ट कामे, इतर शासकीय कामातील अनियमितता व अनागोंदीच्या निषेधार्थ अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर 6 डिसेंबर पासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. विविध मागण्यांसंदर्भात समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.पारनेर तहसील कार्यालय अंतर्गत दीड वर्षापासून थेम व पोटखराबा दुरुस्ती करण्याबाबत जाणीवपूर्वक अधिकारी कार्यवाही करीत नसून, शेतकर्यांची अडवणुक करीत आहे. संबंधित अधिकार्यांवर कारवाई व्हावी. मौजे वडगाव सावताळ (ता. पारनेर) येथील वन विभागाच्या कामाबाबत अनियमितता आहे. काही मजूर कामावर नसताना त्यांच्या खात्यावर पैसे टाकून ते काढून घेण्यात आले आहेत. तेथील मजुराच्या खात्यावर वर्ग केलेल्या रकमेच्या बिलाची चौकशी करावी. मौजे चिंचोली (ता. पारनेर) येथील ग्रामपंचायत अंतर्गत महादेव मंदिर येथील रस्त्याचे काम एक ते दीड वर्षापुर्वी करण्यात आले. सदर झालेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून, या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी, ठेकेदार व सरपंच यांच्यावर शासकीय कारवाई करून गुन्हे दाखल करावे. पारनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मनमानीमुळे ग्रामस्थांच जीव जात असून, नुकतेच 4 नोव्हेंबर रोजी सर्पदंश होऊन कर्मचार्यांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णाची हेळसांड झाल्याने एकाचा मृत्यू झाला. याला जबाबदार असणार्या अनुपस्थित कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करावी. नगर तालुक्यातील मौजे जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, याची चौकशी होऊन शासकीय अभियंता व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत अपंगाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून पदोन्नती घेणार्या शिक्षक कर्मचार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी समितीच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे.
Home महाराष्ट्र निकृष्ट कामे, इतर शासकीय कामातील अनियमितता व अनागोंदीच्या निषेधार्थअन्याय निवारण निर्मूलन सेवा...
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
Congress : जिल्हा काँग्रेस करणार हल्लाबोल आंदोलन
Congress : श्रीगोंदा : कांदा निर्यात (Onion export) बंदी करणे, दूध हमीभाव मागणीकडे दुर्लक्ष करणे व इथेनॉल उत्पादनावर बंदी...
कर्नाटकचे आमदार बीके हरिप्रसाद त्यांच्या विधानावर ठाम आहेत: ‘पाकिस्तान भाजपचा शत्रू, नाही…’
काँग्रेसचे आमदार बीके हरिप्रसाद यांनी गुरुवारी त्यांच्या “पाकिस्तान शत्रू देश भारतीय जनता पक्षासाठी, आमच्यासाठी नाही” या विधानाचा...
हेल्थ टिप्स : पोटाची चरबी कमी करण्यासाठी, ‘या’ 5 कच्च्या भाज्यांचा आहारात करा समावेश
लठ्ठपणा केवळ सौंदर्यच खराब करत नाही तर त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो. तसेच साखर आणि आहारात जास्त कॅलरी खाणे टाळा. जर आपण देखील...
राहुल गांधींच्या ‘बॉडी डबल’ यात्रेची ओळख लवकरच उघड करणार: हिमंता सरमा
आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे की ते लवकरच काँग्रेस खासदार राहुल...




