नाशिक मध्ये तीन लाख रुपये देऊन बोगस लग्न , दोन दलालांना बेड्या, लग्नानंतर महिनाभरात मुलगी माहेरी
Nashik मध्ये तीन लाख रुपये देऊन बोगस लग्न , दोन दलालांना बेड्या, लग्नानंतर महिनाभरात मुलगी माहेरी
. नाशिकमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. येवला तालुक्यातल्या एका मुलाकडून तीन लाख रुपये घेऊन अंबेजोगाईतील मुलीशी लग्न लावून देण्यात आलं. लग्नानंतर महिन्याभरातच मुलगी आईसोबत माहेरी निघून गेली. त्यानंतर मुलीच्या आईनं वेगळाच दावा केला. आम्हाला केवळ ३५ हजार रुपये दिले आणि महिनाभरासाठीच मुलगी देण्याचं ठरलं होतं, असं तिनं सांगितलं…. अखेर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मुलाच्या आईनं पोलिसात तक्रार दिली… आणि पोलिसांनी मग एजंट म्हणून काम करणाऱ्या साहेबराव गीते आणि संतोष फड या दोघांना बेड्या ठोकल्या….. या रॅकेटनं अशापद्धतीनं आणखी कुणाची फसवणूक केलीय का याचा शोध आता नाशिकचे पोलीस घेतायत……





