मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकॅडमी परिसरातील नवीन सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र पोलिस अकॅडमी येथील कंपोझिट इनडोअर फायरिंग रेंज, ॲस्ट्रो टर्फ फुटबॉल मैदान, सिंथेटिक ट्रॅक त्याचप्रमाणे ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदान, सिंथेटिक टॉप असलेले व्हॉलीबॉल व बास्केटबॉल मैदान तसेच निसर्ग या नैसर्गिक जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न झाले.
ऑलिम्पिकमधील यशाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा सुविधांच्या उद्घाटन कार्यक्रमाला महत्त्व आहे. या माध्यमातून ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील. आंतरराष्ट्रीय दर्जाची फायरिंग रेंज उपलब्ध झाल्याने त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. पोलिसांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करताना त्यांना मिळणाऱ्या सुविधांचाही विचार करणे गरजेचे आहे. नव्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन अकादमीने नव्या तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणावर अधिक भर द्यावा, अशी सूचना यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.
CMOMaharashtra Chhagan Bhujbal Aaditya Thackeray – आदित्य ठाकरे #Nashik