नायझेरियाहून अहमदनगरमध्ये आलेल्या मायलेकांना कोरोनादोघांचे सॅम्पल ओमिक्रॉन तपासणीसाठी नगर व पुणे येथे पाठविण्यात आले

498

नायझेरिया येथून अहमदनगर श्रीरामपुरात मायलेक आले आहेत. त्या दोघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ते सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.आता त्या दोघांचे सॅम्पल ओमिक्रॉन तपासणीसाठी नगर व पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती देशमुख यांनी दिली.नायझेरियाहून आलेली 40 वर्षीय आई व तिचा सहा वर्षाचा मुलगा हे दोघे श्रीरामपूर येथे आले. याबाबतची माहिती वैद्यकीय विभागास मिळताच त्यांनी या दोघांची कोरोना टेस्ट केली आहे.या दोघांचेही अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले. त्यानुसार या दोघांनाही उपचारासाठी श्रीरामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या काळात या दोन रुग्णांचा ज्या ज्या नातेवाईक अथवा व्यक्तींशी संपर्क आला त्या सर्वांचीही तपासणी करण्यात आली असता या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. या मायलेकांची ओमिक्रॉन सॅम्पल तपासणीसाठी नगर व पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. हे अहवाल लवकरचप्राप्त होतील. परदेशातून आतापर्यंत 35 जण श्रीरामपुरात आले आहेत. या सर्वांची तपासणी केली असता परदेशातून आलेल्या व्यक्ती व त्यांचे नातेवाईक निगेटीव्ह आढळून आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here