नागपूर कोरोनाच्या विळख्यात, सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारांपेक्षा अधिक; आरोग्य विभाग सतर्क

420

नागपूर :  राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) वाढला आहे. राज्यात दररोज हजारो कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. डेल्टासोबतच कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील राज्यात धुमाकूळ घातला आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये (nagpur) ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असून, ओमिक्रॉनबाधितांची संख्या हाजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. नागपुरात कोरोनासोबत ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने  जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासठी विविध उपयायोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर निर्बंधांमध्ये वाढ करण्यात  आली आहे. तसेच आरोग्य विभागाला देखील सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समाधानाची बाब म्हणजे अनेक कोरोनाबाधितांमध्ये लक्षणेच दिसत नसल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असल्याची माहिती नागपूर महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

उपराजधानी नागपूर पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात येताना दिसून येत आहे. शहरातील रुग्ण संख्या दर दिवसाला वाढत असून, सध्या शहरामध्ये एकूण 4 हजार 158 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्या विभागाकडून  खबरदारी घेण्यात येत असून, वांरवार शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. अनेक कोरोनाबाधितांमध्ये लक्षणेच आढत नसल्याने त्यांना घरीच क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेच्या तुलनेमध्ये कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्ये घट झाल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे.

– नागपुरात सक्रिय रुग्ण संख्या – 4 हजार 158– गृह विलागीकरनात असलेले रुग्ण – 2 हजार 192– 50 टक्के रुग्ण रुग्णालयात– नागपुरात सध्या हॉटस्पॉट नाहीत– सर्दी खोकल्याच प्रमाण जास्त– दर दिवसाला 9 ते 10 हजार चाचण्या

  • 6 जानेवारी – 441 रुग्ण , 0 मृत्यू
  • 7 जानेवारी – 698 रुग्ण , 0 मृत्यू
  • 8 जानेवारी – 691 रुग्ण , 0 मृत्यू
  • 9 जानेवारी – 832 रुग्ण , 0 मृत्यू
  • 10 जानेवारी -971 रुग्ण , 0 मृत्यू

नागपुरातील ही आकडेवारी बघितली तर दिसून येते की रुग्णसंख्या सतत वाढत आहे मात्र मृत्यू च प्रमाण शून्य आहे . बऱ्याच नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, मात्र त्यांना लक्षण अगदी कमी प्रमाणात असल्याने जास्तीत जास्त रुग्ण हे गृह विलगिकरणामध्ये असल्याचं पाहायला मिळते.  गृह विलगिकरणातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, काही प्रमाणात संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here