नागपूरमध्ये नव्या पद्धतीनं होणार जिनोम सिक्वेसिंग, दोन दिवसांत मिळणार अहवाल

432

Coronavirus Update : जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने (Omicorn Variant) खळबळ माजवली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग ओळखण्यासाठी जीनोम सिक्वेंसिंगची (Genome Sequencing) आवश्यकता असते. या जीनोम सिक्वेंसिंगला बरेच दिवस लागतात. मात्र आता ही जीनोम सिक्वेंसिंग केवळ दोन दिवसात होणार आहे. नागपूरमधील स्वदेशी निरी संशोधन संस्थेने जीनोम सिक्वेंसिंगची नवी पद्धत शोधण्यात यश मिळवले आहे. या नव्या पद्धतीमुळे जीनोम सिक्वेंसिंगचा अहवाल दोन दिवसांत उपलब्ध होणार आहे. 

नागपूरच्या निरी संशोधन संस्थेने जिनोम सिक्वेसिंगसाठी नव्या पद्धतीचा अवलंब केला आहे. स्वॅब न घेता गारगलच्या माध्यमातून टेस्ट करण्याची पद्धत देशातील संशोधन क्षेत्रातील अग्रणी मानल्या जाणाऱ्या निरी ह्या संस्थेने यशस्वी करून दाखवली. आता ह्याच गारगलच्या माध्यमातून घेतलेल्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेसिंग करण्यात येत आहे, ज्यासाठी आधी नमुने हैदराबादच्या प्रयोग शाळेत पाठवावा लागायचे. RTPCR टेस्ट सॅम्पल प्रक्रियेतील सलाईन गारगलच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर 53 सॅम्पलची चाचणी करण्यात आली. त्यात 51 नमुने हे ओमायक्रोन व्हेरियंटचे असल्याचे स्पष्ट झाले.

जिनोम सिक्वेंसिंग म्हणजे काय?प्रत्येक विषाणूची जनुकीय संरचना वेगळी असते. विषाणूची जनुकीय संरचना कशी आहे याचा शोध घेणं म्हणजे ‘जिनोम सिक्वेंसिंग’. प्रत्येक विषाणूला स्वत:चा डीएनए (DNA) किंवा आरएनए (RNA) कोड असतो. A, T, G आणि C या न्यूक्लिओ टाईड्सने विषाणूची संरचना ओळखली जाते. विषाणूच्या या संरचनेत मोठा बदल झाल्यास विषाणूचा नवीन ‘स्ट्रेन’ अर्थात नवा प्रकार तयार झाला असे म्हटले जाते. 

सध्याच्या कोविड19 विषाणू संसर्गाचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करुन उपचारांना वेग देणे शक्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here