चीनच्या वुहानमध्ये आता ब्रुसेलोसिस जीवाणूच्या
संसर्गाने लोक आजारी पडत आहेत. नागपुरातही शुक्रवारी एका १४ वर्षीय मुलाला या आजाराचे निदान झाले. खासगी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ? *ब्रुसेलोसिसची गाय, मेंढी, शेळ्या आणि कुत्र्यांना मुख्यत: लागण होते. या आजार झालेल्या प्राण्यांचे कच्चे दूध किंवा कमी शिजविलेले मांस खाल्ल्यास तो होऊ शकतो.* ? जागतिक आरोग्य संघटनेनुसार ब्रुसेलोसिस बॅक्टेरियाग्रस्त प्राण्याच्या दुधापासून बनवलेल्या पनीरमधूनही लागण होऊ शकते. पण संसर्गाचे प्रमाण खूप कमी आहे. या आजारावर एक-दीड वर्ष औषधे घ्यावी लागतात. ? लक्षणे दिसायला एक आठवडा ते दोन महिन्यांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. ताप येणे, डोके दुखणे, सांधे दुखणे आदी लक्षणे दिसून येतात. हा आजार घातक नाही.