नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 753 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 441 एवढी झाली असून यातील 87 हजार 761 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 27 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, धर्माबाद 1 असे एकुण 4 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आज 27 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 18, खाजगी रुग्णालय 3 असे एकुण 27 व्यक्ती उपचार घेत आहेत. जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 63 हजार 186एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 59 हजार 356एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 441एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 761एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंकरुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-27आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3. कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
पहा: मुंबई विमानतळावर ₹ 47 कोटी किमतीचे कोकेन, हेरॉईन कसे लपवले गेले
मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी ₹ 47 कोटी किमतीच्या हेरॉईन आणि कोकेनसह दोघांना अटक करण्यात आली, असे...
भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची ‘गॅरंटी’ आहे: काँग्रेस खासदारांचा पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर
जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उदय 'गॅरंटेड' आहे आणि 2024 च्या निवडणुकीनंतर कोणाचे सरकार बनले...
अहमदनगर शहर पुन्हा हादरले तरुणाला बेदम मारहाण… उपचारादरम्यान मृत्यू
अहमदनगर : लखन घोरपडे यांना बेदम मारहाण उपचारादरम्यान मृत्यूतोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहमदनगर...
भाजप पक्षाने आमचा विश्वासघातच केला :माजी मंत्री महादेव जानकर
भाजप पक्षाने आमचा विश्वासघातच केला :माजी मंत्री महादेव जानकर
भाजप पक्षाने आमचा विश्वासघातच केला आहे, या म्हणण्यावर मी कालही...




