नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयातील सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पातील तीन लाखांची मशीन चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना काल (10 नोव्हेंबर) रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नांदेड : नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयातील सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पातील तीन लाखांची मशीन चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना काल (10 नोव्हेंबर) रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा घेऊन रुग्णालयातील मशीन चोरली.चोरट्यांनी 3 लाखांची मशीन पळवलीपोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णूपुरी, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय परिसरात सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प आहे. विष्णूपुरी भागातील शासकीय रुग्णालयातील सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पाचेठिकाणी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजेचेदरम्यान, तीन लाखांची पाईप जेटेरिटर मशीन उतरवण्यात आली. उपरोल्लेखित मशीन ही जाळीमध्ये असल्याने ती तशीच उपरोक्त ठिकाणी ठेवण्यात आली.
दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी संधी साधत शासकीय रूग्णालयातील सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पाच्याठिकाणी ठेवण्यात आलेली तीन लाख रूपये किंमतीच्या मशीनची जाळी तोडली. चोरटे एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी उपरोल्लेखित मशीनची जाळी तोडली व मशीनमधील पाईप ‘जेटेरिटर’ मशीन चोरून नेली. या प्रकरणातील फिर्यादी प्रविण पाठणे यांनी १० नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेदरम्यान, उपरोक्त ठिकाणी जावून पाहणी केली असता, त्याठिकाणी ठेवलेली मशीन चोरट्यांनी चोरून नेली असल्याची बाब त्यांच्या निदर्शनाला आली. एकूणच, या धाडसी चोरीमुळे विष्णूपुरी, नांदेड येथील शासकीय ‘वैद्यकीय’ महाविद्यालय व रूग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखलयाप्रकरणी प्रविण गजानन पाठणे यांनी दिलेल्या तक्रारीच्याआधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात आरोपी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्र. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव गवळी व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.