- बीएसएनएल’चा ढांसू प्लॅन
- सादर केलाय.
- टेलिकाॅम क्षेत्रातील कंपन्यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या रिचार्ज प्लॅनचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नव्या वर्षात टेलिकाॅम कंपन्या पुन्हा एकदा ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. नव्या वर्षात मोबाईलवर बोलणे आणखी महाग होणार असल्याचे संकेत मिळत आहेत..
- अगदी महिनाभरापूर्वी म्हणजेच 1 डिसेंबर 2021 रोजी टेलिकॉम इंडस्ट्रीमधील दिग्गज समजल्या जाणाऱ्या जिओ (Jio), एअरटेल (Airtel) नि व्हाेडाफोन-आयडियाने (VI) त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये 20 ते 25 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसली..
- असे असताना, या कंपन्या पुन्हा एकदा दरवाढ करण्याच्या विचारात आहेत. पूर्वीच्याच दरवाढीने ग्राहक हैराण झालेले असताना, पुन्हा एकदा दरवाढ झाल्यास त्याचा ग्राहकांवर मोठा परिणाम होणार आहे..
- कशामुळे होणार दरवाढ..?
- सध्या 4G नेटवर्कच्या माध्यमातून मोबाईलधारकांना सेवा दिली जाते. मात्र, भारतात आता लवकरच 5G नेटवर्क सुरु होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना इंटरनेट सेवा जलद गतीने मिळू शकेल. मोबाईलचे रिचार्ज प्लॅनचे रेट वाढविण्यामागे भारतात सुरु होणाऱ्या 5G नेटवर्कचे कारण दिले जात आहे.
- किती वाढ होऊ शकते..?
- टेलिकाॅम कंपन्यांनी 1 डिसेंबर 2021 रोजी टॅरिफ प्लॅनमध्ये 20 ते 25 टक्के दरवाढ केली होती. त्यामुळे पूर्वीच्या प्लॅनमध्ये 20 ते 30 रुपयांपर्यंत वाढ झाली होती. आता किती टक्के दरवाढ होणार, याबाबत कंपन्यांनी काहीही जाहीर केलेले नाही. मात्र, लवकरच प्रीपेडसह पोस्टपेडच्या दरात मोठी वाढ होणार असल्याचे सांगण्यात येते.
- आता एकाच कंपनीचा आधार..!
- टेलिकाॅम क्षेत्रातील खासगी कंपन्यांकडून दरवाढीचा दणका सुरु असताना, आता ग्राहकांना केवळ एकाच कंपनीचा आधार आहे ती म्हणजे, भारत सरकारची भारत संचार निगम लिमिटेड, अर्थात बीएसएनएल..!
- सरकारी टेलिकॉम कंपनी ‘बीएसएनएल’ (BSNL) नि खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत फार मोठा फरक आहे. ‘बीएसएनएल’ ही एकमेव टेलिकॉम कंपनी आहे, जिने प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत वाढ केलेली नाही. खासगी टेलिकॉम कंपन्या दरवाढ करीत असताना, ‘बीएसएनएल’चे पूर्वीचेच दर कायम आहेत.
- ‘बीएसएनएल’चा ढांसू प्लॅन
- ‘बीएसएनएल’ने 187 रुपयांचा प्लॅन सादर केलाय. त्यात 28 दिवसांची वैधता मिळते. शिवाय युजर्संना रोज 2 जीबी डेटा दिला जातो. सोबतच रोज 100 एसएमएस नि अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे.