पुराव्याशिवाय मी आरोप करत नाही
मी काचेच्या घरात राहत नाही. तसेच माझ्यासाठी हा काही सिनेमा नाही. हे गंभीर प्रकरण आहे. त्याला मी धसास लावणारच आहे, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय आरोप करत नाही. फडणवीसांवर आरोप मागे घेण्याची कधीच वेळ आली नाही. आम्ही कधीच आरोप मागे घेतले नाही, असं ते म्हणाले.
फक्त पत्नीसोबतचाच फोटो का ट्विट केला?
मलिकांनी चार वर्षापूर्वीचा फोटो ट्विट केला आहे. त्यांना हा फोटो आज सापडला. रिव्हरमार्च ही संघटना आहे. त्यांना रिव्हर अँथमवर गाणं करायचं होतं. त्यावेळी हा फोटो घेण्यात आला आहे. चौगुले म्हणून आहेत. त्यांनी विनंती केली म्हणून आम्ही त्या मोहिमेशी जोडलो गेलो. माझी पत्नीही त्यांना मदत करत होती. त्यांनी गाणं तयार केलं होतं. त्यावेळी हे फोटो काढले होते. माझ्याही सोबत फोटो काढले आहे. पण मलिक यांनी जाणीवपूर्वक पत्नीसोबतचा फोटो शेअर केला. त्यामागची मानसिकता समजून घेतली पाहिजे, असं सांगतानाच मलिक यांनी माझा फोटो ट्विट केला नाही. कारण माझ्यासोबत कोणीही फोटो काढू शकतो हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे माझ्याबरोबरचा फोटो ट्विट केला असता तर आरोप फुसका ठरला असता, असं ते म्हणाले.
मग सर्व एनसीपीच ड्रग्ज माफिया म्हणायची का?
हे रिव्हर मार्च सोबत आलेले हे लोकं होते. आमचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही.भाजपचं ड्रग्ज कनेक्शन आहे असं मलिक म्हणाले. पण मलिकांचे जावई ड्रग्ज सोबतच सापडले आहेत. मग हाच नियम लावला तर संपूर्ण एनसीपी ड्रग्ज माफिया झाली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.