नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर खलिस्तानी संघटना दहशतवादी हल्ले करू शकतात, अशी माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे…. 

615

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द , हायअलर्ट जारी नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर खलिस्तानी संघटना दहशतवादी हल्ले करू शकतात, अशी माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे….

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर खलिस्तानी संघटना दहशतवादी हल्ले करू शकतात, अशी माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांच्या उद्याच्या साप्ताहिक आणि इतर सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांच्या उद्या (31 डिसेंबर ) साप्ताहिक आणि सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मुंबईवर उद्या हल्ला होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांच्या उद्या सर्व सुट्या रद्द केल्या आहेत. दरम्यान, सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रमुख स्थानकं जसे दादर, वांद्रे, चर्चगेट, सीएसएमटी, कुर्ला आणि इतर स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उद्या 3000 हून अधिक रेल्वे अधिकारी तैनात केले जातील, अशी माहिती मुंबई रेल्वेचे पोलीस आयुक्त क्वेसर खालिद यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here