नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे खुली

नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे खुली

मुंबई कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याचं समोर येणार्‍या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे, मंदिरे सर्वसामान्यांसाठी खुली करावीत यासाठी मोठं आंदोलन केलं होतं. सर्वच स्तरातुन प्रार्थनास्थळे आणि मंदिरे सर्वांसाठी खुली करावीत अशी मागणी जोर धरत होती. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानं ठाकरे सरकारनं (Thackeray Government Big Decision) आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे, मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची आकडेवारी समोर आल्यानंतर आजच राज्य सरकारनं शाळांबाबत देखील निर्णय(Thackeray Government Big Decision) घेतला आहे.दि. 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्यात येणार असल्याबाबत सांगण्यात आलं आहे.दरम्यान, राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here