महाराजा नरेंद्र मोदी यांच्यासाठी भारताने तब्बल ८५०० कोटी रुपये मोजून खरेदी केलेल्या दोन शाही विमानांपैकी एका विमानाचे कालच दिल्लीत आगमन झाले.
दुर्दैवाने, देशाची अर्थव्यवस्था तब्बल २४ टक्क्यांनी (का ५० टक्क्यांनी) आक्रसली असल्याचे उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर या विमानाचे आगमन झाल्याने बहुधा सरकारही लज्जित झाले आहे. त्यामुळेच प्रत्येक गोष्टींचा इव्हेंट करण्याची सवय लागलेल्या सरकारने भारताच्या पंतप्रधानाला थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या बरोबरीला नेऊन बसविणाऱ्या या शाही विमानाच्या स्वागताचा कोणताच सोहळा केलेला नाही. शुक्रवारी गुपचूप दोनपैकी पहिल्या विमानाचे दिल्लीत आगमन झाले. दहा लाखाचा पोषाख घालणाऱ्या, देशातील जनता भूकेकंगाल असली तरी ज्यांच्यावर दिवसाला कोटी रुपये खर्च केले जातात अशा महान सम्राटाच्या सोयीसुविधांमध्ये कोणतीही उणीव राहणे योग्य नाही. या दृष्टीनकोनातूच दोन शाही विमाने खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातील हे पहिले विमान आहे. दुसरे विमानही येत्या महिनाभरातच दाखल होण्याची शक्यता आहे.
या दोन्ही विमानांसाठी गरीब देशाने मोजलेली किंमत ऐकून सामान्य भारतीयांचे डोळेच पांढरे होणार आहेत. या दोन विमानांची किंमत तब्बल ८४५८ कोटी रुपये आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सोयीसाठी खासे विमान असते, त्याची बरोबरी आता होणार आहे. नव्हे व्हायलाच हवी होती. महाराजा नरेंद्र मोदी यांच्यासाठी असे शाही विमान हवेच होते, मग एअर इंडियाचा महाराजा त्यात बुडाला तरी हरकत नाही.
देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान अशा तिघांच्या सोयीसाठी ही विमाने असणार असल्याचा दावा आतापर्यंत केला जात होता. त्यामुळे या शाही विमानातून पहिल्या प्रवासाचा मान राष्ट्रपती कोविंद यांना मिळणार की महाराजा नरेंद्रसिंग तो पटकावणारी एवढेच जनतेने पहायचे आहे.