नरेंद्र मोदींना 72 % रेटींग, भारताचे PM ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

418

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींची आंतरराष्ट्रीय पातळीवरही चांगली क्रेझ आहे. जगप्रसिद्ध नेते म्हणून मोदींनी जगभरात ओळख आहे, हीच ओळख आणखी प्रखर झाली असून जगभरातील टॉप नेत्यांच्या यादीत मोदींनी पहिले स्थान मिळवले आहे. 72 टक्के रेटींगसह मोदी या यादीत पहिल्या स्थानावर असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन 41 टक्क्यांसह सहाव्या स्थानावर आहेत. ग्लोबल लीडर अप्रूव्हल लीस्ट 2022 नुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

अमेरिकेतील रिसर्च एजन्सी असलेल्या मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जगातील लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर असून इंग्लंडेच बोरिस जॉन्सन हे 12 व्या स्थानावर आहेत. 13 जागतिक नेत्यांच्या यादीत जो बिडेन 6 व्या क्रमांकावर आहेत. तर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना 41 टक्के रेटिंग मिळाली आहे, ते आठव्या स्थानावर आहेत. कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रूडो हे 9 व्या क्रमांकांवर असून त्यांनाही 41 टक्के रेटिंग या सर्वेक्षणात मिळाली आहे.

या 13 जगविख्यात नेतेमंडळींच्या यादीत 4 देशांच्या नेत्यांना समसमान म्हणजेच 41 टक्के एवढी रेटींग मिळाली आहे. त्यामध्ये, अमेरिकेचे जो बायडन, दक्षिण कोरोयाचे राष्ट्राध्यक्ष मून जाईन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा समावेश आहे. 

नोव्हेंबर 2021 मध्येही जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल स्थानावर होते. वेबसाइट सध्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स मधील सरकारी नेते आणि देशाच्या नेत्यांचे रेटिंग ट्रॅक करते.

लोकप्रिय नेत्यांची रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढ रहिवाशांच्या सात दिवसांच्या सरासरीवर आधारित आहे. नमुन्यांचा आकार देशांनुसार बदलतो. याच वेबसाइटने मे 2020 मध्ये पंतप्रधान मोदींना 84 टक्के मंजुरीसह सर्वोच्च रेटिंग दिली होती. जी मे 2021 मध्ये 63 टक्क्यांवर आली. ताजी रेटिंग 13 ते 19 जानेवारी 2022 दरम्यान संकलित केलेल्या डेटाच्या आधारे निश्चित करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here