नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे

    11

    महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही

    मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत कराच्या नाहीत

    कर निर्धारित करण्यासाठी असणाऱ्या कर

    योग्य मूल्याच्या नोटीसा, हरकतीसाठी सुविधा :आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगैअहिल्यानगरअहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील इमारतीचे वाढीव वय, नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम, इमारतीच्या वापरातील बदल यासह इतर बदल झालेले आहे, अशा मालमत्ता धारकांना प्रस्तावित नवीन कर्योग्य मूल्याच्या सुधारीत खास नोटीस वाटपाचे कामकाज सुरु आहे. सदर नोटीसमध्ये करयोग्य संपर्क साधून माहिती घ्यावी, काही शंका अथवा चूक असल्यास हर्कत घ्यावी, तशी सुविधा उपलब्ध असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले. मूल्य दर्शविलेले असून तो मिळकतीचा कर नाही. तो कर निर्धारित करण्यासाठी असणारे करोग्य मूल्य आहे. मात्र, मिळकतधारकांनी करयोग्य मुल्यास मालमत्ता कराचे बील असल्याचा चुकीचा समज करून घेतल्याचे दिसत आहे. या नौटीसा मिळकत कराच्या नाहीत, करयोग्य करय मूल्याच्या आहेत. त्यावर अधिनियमानुसार २७% सर्वसाधारण कर व इतर कर आकारण्यात येत असतात. त्यामुळे नागरिकांनी,मालमत्ताधारकांनी या नोटिसांबाबत गैरसमज करू नये. मालमत्ता कर आकारणी विभागात संपर्क साधून माहिती घ्यावी, काही शंका अथ

    अहिल्यानगर महानगपालिका व मे.सि. ई. इन्फो सिस्टीम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महानगरपालिका हद्दीतील इमारती व मोकळ्या जागांच्या सर्वेक्षणाचे कामकाज सन २०२४-२०२५ पासून सुरु करण्यात आलेले होते. सर्व्हेक्षणाचे काम प्रगती पथावर असून सर्व्हेक्षणाचे कामकाज पूर्ण झालेल्या भागातील मिळकतीच्या मालमत्ता कर आकारणीची सुधारीत खास नोटीस वाट्याचे कामकाज सुरु आहे. यात महानगरपालिकेने मालमत्ताकराच्या दरात कुठलीही वाढ केलेली नाही.मालमत्ताधारकांना देण्यात आलेल्या सुधारीत खास नोटीसमध्ये प्रस्तावित करयोग्य मूल्यावर करीता हरकत घेण्याचे अधिकार प्राप्त आहेत. अहिल्यानगर महानगरपालिका प्रभाग समिती कार्यालय क्रमांक १ ते ४ येथे सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत जिथे मिळकतअस्तित्वात आहे, त्या प्रभाग कार्यालयात हरकती स्वीकारण्यात येत आहेत. प्रत्येक हरकत घेणाऱ्या मिळकतधारकाच्या अर्जाची सुनावणी घेऊन त्यांचे समक्ष म्हणणे ऐकून घेऊन त्यानंतर अंतिम कर आकारणीचे मागणी बील कायम आकारण्यात येणार आहे. मिळकतधारकांची प्राप्त सुधारीत खास नोटीसबाबत कुठलीही शंका असल्यास मालमत्ता कर आकारणी विभाग येथे समक्ष संपर्क करू शकतात. मालमत्ताधारकांनी करयोगी मूल्याच्या महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या नोटीसा स्वीकारून त्याची माहिती घ्यावी व पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. या नोटिसांबाबत चुकीची माहिती पसर नागरिकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी कोणालाही शंका असल्यास त्यांनी मालमत्ता कर आकारणी विभागात संपर्क साधावा, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here