
नगर : नगर (Nagar) शहराला पाणी पुरवठा (Water Supply) करणारी मुख्य पाईपलाईन आज बाभुळगाव शिवारात फुटली आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा (Water Supply) विस्कळीत होणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने (AMC) केले आहे.
नगर शहराची मुख्य जलवाहिनी आज (शुक्रवारी) दुपारी 2 वाजेच्या सुमारास पाण्याच्या दबावामुळे फुटली. त्यामुळे मुळानगर येथून होणारा पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.
जलवाहिनी फुटल्यामुळे शनिवारी (ता. 2) व रविवारी (ता. 3) या दोन्ही दिवशी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागांना कमी दाबाने व उशिरा पाणी पुरवठा होईल. तर शनिवारी (ता. 2) सावेडी, भुतकरवाडी, बोरुडे मळा, बालिकाश्रम रस्ता या भागाचे पाणी वाटप बंद राहणार आहे. या भागाला रविवारी (ता. 3) पाणी वाटप होईल, असे महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.