
अहिल्यानगर – नगर तालुक्यात मागील काही दिवसांपासून अत्यंत जोरदार व मुसळधार पाऊस तसेच ढगफुटी झाली आहे. यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सर्व गावातील सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवी या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. नुकसान भरपाई मिळाली नाही तर आंदोलन केले जाईल असा इशारा नगर तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख राजेंह भगत सह शिवसैनिकानी दिला.
नगर तालुक्यात व मंडळामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मुसळधार व जोरदार पाऊस झाला अनेक मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असुन काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने आणखी काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अनेक तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. त्यामध्ये नगर तालुक्यामध्ये (रविवारचा पाऊस मिलिमीटर मध्ये) नगर तालुका 98.5 टक्के नोंदवण्यात आला. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे व उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नगर तालुक्यातील वाळुंज या गावातील बावीस वर्षे तरुण पुराच्यागावातील नद्या, नाले, बंधारे, तुडुंब भरून वाहत आहेत. काही गावातील रस्ते, पूल तुटल्यामुळे गावाचा संपर्क तुटलेला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सोयाबीन, मूग, बाजरी, कांदा व मका याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर नगर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी फळबागांची लागवड करत असतात. त्यामध्ये डाळिंब, संत्री, मोसंबी व लिंबू या फळबागा पावसामुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांचे घरे, जनावरे, जनावरांची गोठे वाहून गेले आहेत. विजेचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
नगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. व तहसीलदारांमार्फत ताबडतोब सर्व मंडळातील सरसकट नुकसान भरपाईचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी नगरसेवक योगीराज गाडे, संदीप गुंड, निसार शेख, आप्पासाहेब भालसिंग संतोष काळे, जालिंदर शिंदे, संजय भालसिंग, संदीप खामकर, गणेश कुलट, सोमनाथ कांडके, कैलास कुलट, पोपट निमसे, जिवा लगड, योगेश लांडगे, सनी लांडगे, रविराज जाधव यावेळी उपस्थित होते.