नगर तालुक्यातील विद्यालयाच्या मुख्याध्यापकाची हाकालपट्टी करण्याची मागणी

    148

    शिव प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन.पिंपळगाव माळवी येथील श्रीराम विद्यालयाच्या मुजोर मुख्याध्यापकाची हाकालपट्टी करण्याची मागणी.नगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव माळवी येथील श्रीराम विद्यालय च्या मुजोर मुख्याध्यापक दरवर्षी गणवेश बदलून शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून एक हजार रुपये घेऊन विद्यालयामध्ये मनमानी कारभार करत असल्याच्या निषेधार्थ या मुख्याध्यापकाची हाकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देताना शिव प्रहार संघटनेचे गोरख आढाव समवेत भगवान भोदे, गौरव भोसले, महादेव भोसले, अक्षय वाघ आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हटले आहे की, पिंपळगाव माळवी येथील श्रीराम विद्यालयच्या मुजोर मुख्याध्यापक दरवर्षी विद्यार्थ्यांचे गणवेश बदलतो मुख्याध्यापकावर कोणाचेही वचक राहिलेला नाही त्यामुळे हा मुजोर मुख्याध्यापक सध्या विद्यालयांमध्ये मनमानी कारभार करत आह आहे विद्यालयांमध्ये शिक्षणाचा दर्जा खालवलेला आहे स्वतःच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या आणणे पार्टी करणे तसेच कपड्याचे दुकान विद्यालयांमध्ये सुरू करणे तसेच विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी प्रत्येकी एक हजार रुपये घेऊन आपल्या खिशात घालुन तसेच विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी शाळा सोडण्याच्या दाखल्यासाठी ५०० रुपये ची मागणी करणे विद्यालयांमध्ये मुख्याध्यापकाला शिक्षण भरतीचा अधिकार नॅसतानाही जागा भरल्या गेल्या आहेत या शिक्षकांकडून मुख्याध्यापकाने काही कडून १० लाख व काहींकडून २० लाख रुपये प्रत्येकी असा लाखोचा ऐवज तत्कालीन शिक्षणाधिकारी तसेच मुख्याध्यापकाने संगममताने या रकमेचा अपहार केलेला आहे. त्यामुळे या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांची तसेच पिंपळगाव माळवी चे मजूर मुख्याध्यापक यांची शासनामार्फत नार्को टेस्ट करण्यात यावी तसेच जे शिक्षक भरती चालू आहे ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे या भरतीला शिक्षणाधिकाऱ्यांनी स्थगिती द्यावी व या प्रकरणाच्या तपास एसीबी लाच लुचपत पथकाकडे देण्यात यावा व विद्यार्थ्यांकडून घेतलेले प्रत्येकी १ हजार रुपये परतावा करण्यात यावा तसेच गणवेशाला स्थगिती मिळावी अन्यथा येत्या ८ दिवसात शिव प्रहार संघटना व पिंपळगाव माळवीचे ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी १५ जुलै ला जिल्हा परिषद कार्यालयच्या ऑवारात उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here