नगर जिल्ह्यातील ८ गुन्ह्यातील ९ लाखांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद ; एलसीबीची कारवाई
अहमदनगर – जिल्ह्यातील श्रीरामपूर, शिर्डी, नेवासा, पाथर्डी, सोनई, जामखेड, एमआयडीसी परिसरात दरोडा, जबरी चोरी करणा-या अट्टल गुन्हेगाराकडून ८ गुन्ह्यातील ९ लाख १२ हजार रु. कि.चे रु.कि.चे १७२ ग्रॅम सोन्याच्या दागिण्यासह मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. सचिन सुरेश भोसले ( वय २३, रा. सलाबतपुर, ता. नेवासा) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, अशी माहिती जिल्हा पोलिडस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी (दि.१८) पञकारांशी बोलताना दिली.
यावेळी अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.श्री पाटील पुढे म्हणाले की, आदेश दिल्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई सोपान गोरे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्ता मनोहर गोसावी भाऊसाहेब कुरुंद, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, संदीप पवार, पोना ज्ञानेश्वर शिंदे, शंकर संदीप दरले सचिन आडवलशाल दळवी, लक्षमण खोकले, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकाॅ रणजीत जाधव, रविंद्र घुंगासे, जालिंदर माने, सागर ससाणे, मेघराज कोल्हे, योगेश सातपुते, रोहित येमुल, मयुर गायकवाड, विजय धनेवर मच्छिंद्र बर्डे , विनोद मासाळकर, चापोहको उमाकांत गावडे व चापोना भरत बुधवंत आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून, कपाटातील सामानाची उचका पाचक करून, घरातील पेट्या घराचे बाहेर १ लाख ९९ हजार ३५० रु.किचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला, या दादासाहेब ज्ञानदेव मरकड, (वय ४०, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर ) यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६३/२०२२ भादविक ३९४, ४५९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्याच्या तपासाच्या एलसीबीचे पोनि श्री कटके यांना सूचना दिल्या होत्या. तपास सुरु असताना गुन्हा पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली.
आरोपी सचिन भोसले हा त्याचे नेवल येथे चोरी केलेले सोन्याचे दागिने मोडण्यासाठी घेऊन येणार आहे. माहितीवरून पोलिस पथकाने सलाबतपुर (ता. नेवासा) या परिसरातून माहिती घेऊन आरोपी हा नेवासा येथे चोरी केलेले सोने विकण्यासाठी खडकाफाटामार्गे नेवाशाकडे एक काळे रंगाचे दुचाकीवर त्याच्या दोन साथीदारासह येणार आहे.
खडकाफाटा ( ता. नेवासा) येथे सापळा लावला, काही वेळेने सलाबतपुरकडून खडकाफट्याकडे दुचाकीवर अज्ञात तीनजणयेतांना दिसले. पोलीसांना पथकाची खात्री होताच त्यांना थांबण्याचा इशारा करताच त्यांनी दुचाकीचा वेग वाढून नेवासा फाट्याच्या दिशेने जोरात जाऊ लागताच, दुचाकीवर पाठीमागे बसलेल्याची कॉलरला पकडून धरून ठेवले.
पण दुचाकीवरील पुढे बसलेले दोनजण जोरात च नेवासा फाट्याच्या दिशेने पळून गेले. यावेळी पोलिसांनी पकडलेल्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने सचिन सुरेश भोसले (वय २३ लावलपुर ता. नेवासा) असे असल्याचे सांगितले.
पळून गेलेल्यांची असिफ नासिर शेख (रा. वांळुज, जि. औरंगाबाद), गुलब्या शिवाजी भोसले (रा.गोंडेगाव,ता.नेवासा), अशी नावे आहेत. यावेळी ताब्यात घेतलेल्या आरोपी सचिन सुरेश भोसले यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली.
त्याच्याकडे एका पांढ-या गोणीच्या पिशवीमध्ये ९७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळून आले. यावेळी पोलिस खाक्या दाखविताच त्याने मागील तीन-चार महिन्यात श्रीरामपूर, नेवासा, कुकाणा, सोनई, पाथर्डी, जामखेड व एमआयडीसी परिसरात साथीदारासह चो-या केल्या.
चोरीतील सोने आम्ही आमच्या ओळखीचा सोनार दादा संपत म्हस्के (रा. नेवासा ) याच्याकडे मोडण्यासाठी घेऊन चाललो होतो, अशी माहिती दिली. जिल्ह्यातील दाखल गुन्हे अभिलेख पडताळणी केली.
यात ८ गुन्हे दाखल असून आरोपीनी गुन्हे केल्याची कबुली दिली, असे श्री पाटील यांनी सांगितले.




