नगर जिल्ह्यातील अपहरण झालेल्या १०० मुलींचा दोन वर्षात शोध; पोलिसांकडून मुली पुन्हा पालकांच्या ताब्यात…

    49

    अहिल्यानगर : राहुरी पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत गेल्या दोन वर्षात १०० मुलींचा शोध घेऊन त्यांना पुन्हा पालकांच्या ताब्यात देण्यात आले. या मोहिमेत गेल्या ९ वर्षात अपहरण झालेल्या मुलींचा शोध लागलेला आहे. यातील बहुतांश घटनांमध्ये अल्पवयीन मुलींना विविध प्रकारचे आमिष दाखवून त्यांचे अपहरण केल्याचे पोलिसांना आढळले आहे.

    राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी ही माहिती दिली. या सर्व गुन्ह्यांमध्ये आत्तापर्यंत् मुख्य आरोपीसह अपहरणास वेगवेगळ्या प्रकारे मदत करणारे, उदाहरणार्थ वाहन उपलब्ध करणारे, अत्याचार करण्यासाठी हॉटेल, लॉजची खोली उपलब्ध करणारे, मुलांचे आई-वडील, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी अशा मुख्य ९५ आरोपी व त्यांना सहाय्य करणारे १७ महिला व व पुरुषांना आरोपी रून त्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आरोपीचा मित्र असलेल्या एका गृहरक्षक दलाच्या जवानाचाही समावेश आहे.

    राहुरी तालुक्यात ९६ गावे व दोन नगरपालिका आहेत. जानेवारी २०२४ मध्ये एकाच महिन्यात ६ मुलींचे अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल झाले. मात्र एकाही मुलीचा शोध लागला नाही. त्यामुळे पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी मागील काही वर्षातील अपहरण झालेल्या परंतु शोध न लागलेल्या मुलींचा माहिती घेतली. त्यानंतर ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत प्राधान्याने मुलींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्याच्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले.

    याचाच परिणाम म्हणून गेल्या दोन वर्षात १०० अपहृत मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात राहुरी पोलिसांनी यश आले.बहुतांश प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलांना कौंविड काळात निरंतर शिक्षणासाठी पालकांनी किंवा शाळांनी हातात दिलेले मोबाईल मानगुटीवर बसल्याचे आढळले. स्मार्टफोनचे विविध अॅप आई-वडील किंवा शिक्षकांना समजणार नाही अशा पद्धतीने एकमेकांना संपर्क करण्यासाठी वापरले जाऊ लागले. बऱ्याच प्रकरणात अश्लील चित्रफिती अल्पवयीन मुलींना दाखवून त्यांच्या मनावर ताबा घेतल्याचेही तपासात निष्पन्न झाले. अनेक समाज माध्यमांवरील प्लॅटफॉर्म १८ वर्षांवरील नागरिकांसाठी असतात. परंतु ते तपासण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने व पेरंटल कंट्रोलबाबत सामान्यांना माहिती नसल्याने मोबाईल तथा इंटरनेटवर मुले काय पाहतात याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे जाणवते. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, राहुरी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here