अहमदनगर एम.आय.डी.सी .मध्ये औद्योगीकरण व उद्योजकांचे अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उद्योग राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे पाठपुरावा करून बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. नगर एम.आय.डी.सी. चा विस्तारीकरणाचा प्रश्न याच बरोबर एम.आय.डी.सी.तील १६८ प्लॉट धारकांचा प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बैठकीत सांगितले की नगर एम.आय.डी.सी .च्या विकासासाठी नेहमीच सहकार्य राहील. एम.आय.डी.सी. च्या विस्तारीकरणासाठी पुढाकार घेऊ तसेच १६८ प्लॉट धारकांचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असून न्यायप्रक्रिया चा आदर करीत कायद्याने मार्ग काढून उद्योजकांना न्याय देऊ याच बरोबर आमदार संग्राम जगताप यांनी एम.आय.डी.सी. संदर्भात सुचवलेले प्रश्न मार्गी लावू !आमदार संग्रामभैय्या जगताप म्हणाले की नगर एम.आय.डी.सी. चा विकास करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उद्योग राज्य मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. अहमदनगर एम.आय.डी.सी. मध्ये मोठे उद्योग आल्यानंतर अनेक युवकांना रोजगार मिळणार आहे. या कामासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील असे ते म्हणाले.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली नगर एम. आय .डी .सी. संदर्भात बैठक संपन्न झाली. यावेळी उद्योग राज्यमंत्री आदितीताई तटकरे, आमदार संग्रामभैय्या जगताप, उद्योजक सागर निंबाळकर, सचिन काकड, सुनील कानवडे, सुमित लोढा, सचिन फाटक, औद्योगिक कार्यकारी अधिकारी डॉ.पी.अन्बलगन आदी उपस्थित होते.
Home महाराष्ट्र अहमदनगर नगर एम आयडीसीत स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घातलं लक्ष,...
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
ज्येष्ठ विचारवंत, समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्वेट यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
दि. 25 ऑगस्ट 2021.
मुंबई, दि. 25: आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधक, अभ्यासक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ....
शरद पवार जातीयवादी असल्याचा राज ठाकरेंचा आरोप; तर, रामदास आठवले म्हणतात…
Ramdas Athawale on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जातीयवादी असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
व्हिडिओ: नितीन गडकरी यांनी “मार्व्हल ऑफ इंजिनियरिंग” द्वारका एक्सप्रेसवे सादर केला
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पूर्वी ट्विटर...
ज्युनियर NTR चे चुलत भाऊ नंदामुरी तारका रत्न राजकीय रॅली दरम्यान कोसळले आणि हृदयविकाराचा...
ज्युनियर NTR चा चुलत भाऊ, अभिनेता नंदामुरी तारका रत्न राजकीय रॅली दरम्यान कोसळला आणि हृदयविकाराचा झटका आला....





