
नगर : अहिल्यानगर शहरातील कापड बाजार परिसरात फर्निचर व्यावसायिकाला अडवून दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात संशयित इस्टेट एजंट विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. इकराम तांबडकर (रा. घासगल्ली, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित इस्टेट एजंटचे नाव आहे. याप्रकरणी फिरोज तांबटकर (वय ३९, रा. घासगल्ली) यांनी फिर्याद दिली आहे.



