
आता गौतमी नगरसेविका होऊन लोकांची सेवा करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे खरंच गौतमी आता राजकारणात उतरणार आहे का…? गौतमीने डान्स सोडून आता राजकारणात प्रवेश करणार आहे की…? गौतमी पाटील आता निवडणुकीत उतरणार आहे.? असे अनके प्रश्न प्रेक्षकांना पडले होते.
नगरसेविका होऊन गौतमी जनतेची सेवा करणारा. हा मेसेज व्हायरल होत होता. कारण, मुंबई, पुण्यासह 29 ठिकाणी निवडणुका आहेत… त्यामुळे गौतमी कुठून निवडणूक लढणार आहे…? खरंच गौतमी आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे का..? असा प्रश्न सर्वाना पडला होता त्यामुळे अनेकांना सत्य जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती.
याबाबत खरी माहिती ही गौतमीच देऊ शकते. त्यामुळे माध्यमांनी थेट गौतमी पाटीलशी संपर्क साधला, पडताळणी केली. परंतु गौतमी पाटीलने निवडणूक लढणार नाही. राजकारणात इंटरेस्ट नसल्याचे सांगितले फक्त अ अक्टिंग, डान्स सादर करणार असल्याचेही ती म्हणाली. गौतमी पाटील ही कलाकार आहे… आणि ती कला सादर करून मनोरंजन करत आहे.



