नगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत मोठा बदल, दिलीप सातपुतेंना पदावरून हटवलं, सचिन जाधवांकडे शहर प्रमुखपदाची जबाबदारी

    129

    अहमदनगर : आगामी18विधानसभा Sabha निवडणुकीच्या (Vidhan Election) पार्श्वभूमीवर नगर शहर शिवसेना शिंदे गटात (Shivsena Shinde Camp) मोठा बदल करणात आला आहे. शहर शिवसेनाप्रमुख दिलीप सातपुते (Dilip Satpute) यांना पदावरून हटविण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आदेशानुसार नगर शहराच्या प्रमुखपदी सचिन जाधव(Sachin Jadhav) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    एकनाथ शिंदे यांच्यानेतृत्वाखालीआमदारांनी उद्धव ठाकरे (UddhavThackeray) यांची साथ सोडून भाजपाशी(BJP) हातमिळवणी केली. त्यानंतर पक्षआणि चिन्ह शिंदे गटाला मिळाले. त्यानंतरदिलीप सातपुते यांची नगर शहरप्रमुख म्हणूननियुक्ती करण्यात आली होती. आता आगामीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरसंघटनेत खांदेपालट करण्यात आली आहे.

    सचिन जाधव यांची नगर शहरप्रमुख नियुक्तीसंपर्क प्रमुखपदाची धुरा सांभाळणारे सचिन जाधव यांच्यावर नगर शहरप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एक वर्षासाठी ही नियुक्ती करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. शहरात संघटना बांधणीसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच, नगर शहर हा शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला असल्याने नगरची जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी पक्षाकडे आग्रह धरणार असल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here