नगरमध्ये तलवारी, गावठी कट्टे आणि धारदार हत्यारे जप्तकोतवाली पोलिसांची मोठी कारवाई
नगर शहरातल्या आगरकर मळा भागाजवळ एक गायके वस्ती आहे. या वस्तीशेजारुन जात असलेल्या पुणे- शिर्डी बाह्यवळण रस्त्यावरच्या उड्डाणपुलाखाली गावठी पिस्तूलासह तलवारी आणि धारदार हत्यारे जप्त करण्यातआली आहेत.
कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केलीय.आगरकर मळा भागातल्या एका टोळीकडे धारदार शस्त्रे असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली.
क्षणाचाही विलंब न लावता कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपतराव शिंदे यांनी पोलीस सब इंन्स्पेक्टर मनोज महाजन आणि गुन्हे शोध पथकातल्या अंमलदारां सह घटनास्थळी जाऊन छापा टाकला.
मात्र पोलिसांना पाहून वाहनावरुन पळून जात असलेल्या गुन्हेगारांना कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून पकडले.
सुनिलसिंग जितसींग जुन्नी, आझाद लक्ष्मण शिंदे, शंकर अशोक पंडीत, सागर दिनेश बिनोडे, आकाश अगस्तीन आढाव अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावं आहेत. दरम्यान, संतोष रमेश पंडीत आणि त्याचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.
या पकडलेल्या आरोपींकडून ३५,४५०/- रु किंमतीचा गावठी बनावटीचा स्टीलचा कट्टा,एक मॅगझीन व १ जिवंत काडतुसे व ४५० रु कि.अंदाजे २) ९५,६५०/- रु अंदाजे किंमतीच्या तीन दुचाकी गाड्या एक लोखंडी चाकु व रोख रक्कम, एक रेड काॅप नावाची लाल मिर्ची पावडरचा स्प्रे बाँटल, कापडाच्या तुकड्यात गुंडाळलेल्या दोन लोखडी तलवारी, लाकडी मुठ असलेले२ कोयते, २५० ग्रॅम वजणाची लाल रंगाची मिर्ची पावडर अशी शस्त्रे आणि दरोडा टाकण्याचे साहित्य पोलिसांनी या कारवाईदरम्यान जप्त केले आहे.
नगरचे जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे आणि गुन्हे शोध पथकाचे पोसई मनोज महाजन, पोना गणेश धोत्रे , पोना सलीम शेख , पोना नितीन शिंदे, पोना सागर पालवे, पोना संतोष गोमसाळे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना योगेश कवाष्टे, पोना राजु शेख, पोकॉ अभय कदम, पोकॉ दिपक रोहकले, पोकॉ सोमनाथ राउत, पोकॉ अमोल गाढे, पोकॉ अतुल काजळे,पोकॉ संदिप थोरात पोकॉ याकुब सय्यद यांनी केली.






