
अहिल्यानगर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा आणि ०१ नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी प्रक्रिया आज, दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता नियोजित केंद्रांवर सुरू करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने खालीलप्रमाणे तयारी केली आहे:
प्रशासकीय सज्जताः मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याचा अंदाज आहे.
सुरक्षा व्यवस्थाः सर्व मतमोजणी केंद्रांवैर आणि परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये त्रिस्तरीय सुरक्षा, CCTV निगराणी, राज्य राखीव पोलीस दल (SRPF) आणि सशस्त्र पोलिसांचा समावेश आहे.
निर्बंध व सूचनाः
१. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये जिल्ह्यात दिनांक १६ ते २२ डिसेंबर या कालावधीत विजयी मिरवणुका काढण्यास मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
२. मतमोजणी केंद्रात मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास सक्त मनाई आहे.



