अहमदनगर(प्रतिनिधी)- पाथर्डीत तालुक्यात रंगलेल्या उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषक स्पर्धेत अहमदनगरच्या केडगाव मधील सुदर्शन कोतकर याने अंतिम विजेतेपद पटकाविले. अंतिम कुस्तीची लढत सुदर्शन कोतकर (नगर) विरुध्द बाळू बोडखे (नाशिक) यांच्यात लाल मातीच्या आखाड्यात झाली. या कुस्ती स्पर्धेत कोतकर याने घुटना डावावर बोडखे याला चितपट केले. शेवट पर्यंत कुस्ती रंगली होती. यामध्ये कोतकर याने बोडखेवर आपला कब्जा मिळवत घुटना डावावर आसमान दाखवले. यावेळी प्रेक्षकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. प्रतिस्पर्धी मल्लाने कुस्ती झाली नसल्याचे स्पष्ट केले. या कुस्तीचे व्हिडिओ चित्रीकरण पाहून पंचांनी कोतकर विजयी झाल्याचे घोषित केले. तर या उत्तर महाराष्ट्र कुस्ती कुस्ती स्पर्धेत इतर गटातही अहमदनगरच्या मल्लांनी वर्चस्व दाखवले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा तालीम संघ, संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे व श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने एस.एम. निर्हाळी उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात कुस्त्यांचा थरार रंगला होता. सकाळ ते संध्याकाळ पर्यंत सहा गटात कुस्त्या रंगल्या होत्या. सर्व कुस्त्या मॅटवर घेण्यात आल्या. शेवटची उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषक स्पर्धेची कुस्ती लाल मातीत बेमुदत निकाली लावण्यात आली होती. यामधील विजयी मल्लास स्पर्धेचे आयोजक अॅड. प्रतापकाका ढाकणे यांच्या हस्ते चांदीची गदा व 51 हजार रुपये रोख बक्षिस देण्यात आले. तर उपविजयी मल्ल बाळू बोडखे याला 31 हजार रुपये व चषक तर तृतीय विजेता अनिल ब्राम्हणे याला 21 हजार रोख व चषक देण्यात आले. यावेळी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार पै. नाना डोंगरे, पाथर्डी तालुका तालीम संघाचे सचिव पै. राजेंद्र शिरसाठ, शहराध्यक्ष नामदेव लंगोटे, मोहन हिरणवाले, ऋषीकेश ढाकणे, अॅड. सिध्देश ढाकणे, माजी सभापती काशीनाथ लवांडे, पाथर्डी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, रफिक शेख, सिताराम बोरुडे, नगरसेवक बंडू बोरुडे, डॉ. दिपक देशमुख, लक्ष्मणराव डोंमकावळे, हाजी हुमायुम अत्तार, प्रा. गाडे, गहिनीनाथ शिरसाठ, डॉ. राजेंद्र खेडकर, सतीश मुनोत, कपील अग्रवाल, सुनिल भिंगारे, महादेव आव्हाड, नाशिक जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष गोरखनाथ बळकवडे, डॉ. शिवाजी खेडकर, संग्राम शेळके, योगेश रासने, नगरसेवक सुभाष लोंढे, हर्षवर्धन कोतकर, शिवाजी चौधरी, हिरामन वाघ, युवराज पटारे, शांताराम बागुल, गहिनीनाथ शिरसाठ, देवा पवार, बाळासाहेब घुले, विक्रम बारवकर, शिवाजी बडे, रफिक शेख, दिगंबर गाडे, दिगंबर ढवण आदी उपस्थित होते.या स्पर्धेत 48 किलो वजन गटात प्रथम- संकेत सतरकर (नगर), द्वितीय- अंकुश भडांगे नाशिक, तृतीय- वैभव तुपे (नाशिक), 58 किलो वजन गटात प्रथम- पवन ढोन्नर (नाशिक), द्वितीय- शुभम मोरे (नाशिक), तृतीय- महेश शेळके (नगर), 65 किलो वजन गटात प्रथम- सुजय तनपुरे, द्वितीय- भाऊसाहेब सदगीर, तृतीय- अशोक पालवे, 74 किलो वजन गटात प्रथम- महेश फुलमाली (नगर), द्वितीय- संदीप लटके (नगर), तृतीय- आकाश घोडके (नगर), 84 किलो वजन गटात प्रथम- ऋषीकेश लांडे (नगर), द्वितीय- विजय पवार (श्रीगोंदा), तृतीय- विकास गोरे (नगर) यांनी बक्षिसे पटकाविले. कुस्ती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी एकलव्य परिवाराचे सर्व सहकारी परिश्रम घेत आहे. कुस्ती स्पर्धेचे समालोचन शंकर अण्णा पूजारी यांनी केले. स्पर्धेचे पंच म्हणून गणेश जाधव, संजय डफळ, शुभम जाधव, राहुल कापसे, चेतक बळकवडे, राम यादव, गणपत चुंबळे, सन्नी चौधरी, हरीमाना शिंदे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी एकलव्य परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
Home महाराष्ट्र अहमदनगर नगरच्या सुदर्शन कोतकरने पटकावला उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषकनाशिकच्या मल्लास चितपटअहमदनगर जिल्ह्यातील मल्लांनी...
ताजी बातमी
विक्रम राठोड यांनी स्व. अनिलभैय्यांशी गद्दारी केली…
आम्ही आजही मातोश्री आणि स्व. अनिलभैय्या राठोड यांचे निष्ठावान शिवसैनिकप्रतिनिधी : संपूर्ण हयात स्व. अनिलभैय्या राठोडयांनी मातोश्रीशी...
उध्दव ठाकरे म्हणतात…. तर फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना आपल्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'चे दरवाजे बंद केल्याचं भाष्य केलं...
आपटे ठरला एक दिवसाचा नगरसेवक… लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर आपटेंनी दिला राजीनामा; भाजप बॅकफूटवर
राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या तुषार आपटे यांची भाजपाने बदलापूर कुळगाव...
चर्चेत असलेला विषय
भारतीय व्हिसा अर्जदारांसाठी प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी अमेरिकेचा नवीन उपक्रम
नवी दिल्ली: भारतातील व्हिसा प्रक्रियेतील विलंब कमी करण्याच्या उद्देशाने, अमेरिकेने नवीन उपक्रम सुरू केले आहेत, ज्यात प्रथमच...
दिल्ली मेट्रोमध्ये ब्रॅलेट आणि मिनी स्कर्ट घातलेली महिला व्हायरल झाली आहे. असभ्यतेचे कायदे काय...
DIY ब्रॅलेट आणि स्कर्ट घातलेल्या दिल्ली मेट्रोवरील एका महिलेचे अलीकडील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात...
“आम्ही जम्मू आणि काश्मीर (राज्य) मध्ये चांगले आहोत”: कार्यकर्त्याची लडाख लढाई
श्रीनगर: सोनम वांगचुक, लडाखचे सर्वोच्च पर्यावरणवादी आणि एक सुप्रसिद्ध नवोदित, म्हणतात की लडाख कायमस्वरूपी राज्यपाल राजवटीत राहू...
पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जाहीर, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
नवी दिल्ली: देशातील पेट्रोलियम कंपन्यांकडून सामान्य नागरिकांना पुन्हा एकदा दिलासा देण्यात आला आहे. रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला...




