*अहमदनगर :- नगरचे निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना तात्पुरता जामीन मंजूर, रुग्णालयातील आग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर घेतली होती न्यायालयात धाव*
सिव्हील रुग्णालय जळीतकांड प्रकरण : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी निलंबित झालेले तत्कालिन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा यांनी दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता.सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात डॉ.पोखरणा यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्यामुळे डॉ. सुनिल पोखरणा यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला असल्याचे समजते.या गुन्ह्यात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाबद्दल भादंवि कलम 304 हे लावले आहेत.अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात या अर्जावर सुनावणी सुरू आहे. दरम्यानच्या काळात माननीय न्यायालयाने डॉ. सुनील पोखरणा यांना काही अटी व शर्ती वर तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना मंगळवारी (ता.9) अटक करण्यात आली आहे. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.