नगरकरांना दिवाळी भेट | महानगरपालिकेची थकबाकी वसुलीसाठी 75 टक्‍के शास्‍ती माफी जाहीर

नगरकरांना दिवाळी भेट. महानगरपालिकेची थकबाकी वसुलीसाठी 75 टक्‍के शास्‍ती माफी जाहीर. नागरिकांनी घरपट्टी भरून मनपास सहकार्य करावे.  – मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे*           अहमदनगर महानगरपालिकेने 1 नोव्‍हेबर ते 30 नोव्‍हेंबर या कालावधीसाठी (1 महिन्‍यासाठी ) 75 टक्‍के शास्‍ती माफी जाहिर करून कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर थकबाकीदार मालमत्‍ताधारकांना मोठा दिलासा दिला आहे. तरी सर्व सबंधीत थकबाकीदार मालमत्‍ताधारक यांनी या शास्‍तीमाफीचा लाभ घ्‍यावा असे आवाहन मा.महापारै श्री.बाबासाहेब वाकळे व मा.आयुक्‍त श्री.श्रीकांत मायकलवार यांनी केलें आहे.       शास्‍तीमाफी संदर्भात मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे व मा.आयुक्‍त श्री.श्रीकांत मायकलवार यांनी आज दिनांक  2/11/2020 रोजी दुपारी 1-00 वा. महानगरपालिकेच्‍या स्‍थायी समितीच्‍या सभागृहामध्‍ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे. यावेळी उपमहापौर मा.सौ.मालनताई ढोणे, स्‍थायी समितीचे सभापती मा.श्री.मनोज कोतकर, विरोधीपक्ष नेता मा.श्री.संपत बारस्‍कर, नगरसेवक मा.डॉ.श्री.सागर बोरूडे, मा.श्री.मनोज दुलम, मा.समद खान, मा.श्री.विलास ताठे, मा.श्री.उदय कराळे, उपायुक्‍त श्री.लांडगे आदी उपस्थित होते.       सदर कालावधीमध्‍ये माहे नोव्‍हेंबर अखेर सर्व प्रभाग कार्यालयाचे वसुली कार्यालय सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायं. 7 पर्यत  व रविवारी व सुटीच्‍या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यत भरणा स्विकारण्‍यासाठी सुरू राहतील असे मा.आयुक्‍त श्री.श्रीकांत मायकलवार यांनी सांगितले. तरी सर्व मालमत्‍ताधारक यांनी सदर योजनेचा लाभ घेवून घरपट्टी भरून मनपास सहकार्य करावे असे आवाहन मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी यावेळी केले.       मा.आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी या शास्‍ती माफीच्‍या कालावधीनंतर ही जे मालमत्‍ताधारक आपली थकबाकी भरणार नाही अशावर वसुलीसाठी जप्‍ती मोहिम आदी ची कारवाई करण्‍यात येईल असे म्‍हणाले. कोरोना साथीमुळे मनपाची वसुलीवर मोठया प्रमाणात परिणाम झाला असून मनपाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता पर्यत 15.50 कोटी वसुली झाली असून आणखी मोठया प्रमाणात थकबाकी असून सदर थकबाकी एकूण रूपये 196 कोटी येणे  असून त्‍यापैकी 94 कोटी रूपये निव्‍वळ थकबाकी असून रक्‍कम 102 कोटी रू. व्‍याजापोटीचे आहेत. सदर व्‍याजामध्‍ये 75 टक्‍के सुट देवून मुद्दल रक्‍कम वसुल करणे हा मुख्‍य उद्देश असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.SHOW LESS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here