Covid 19 : ओमायक्रॉन व्हेरियंटचा (Omicron) प्रसार जगभरात झपाट्याने वाढत आहे. या प्रकारात अनेक प्रकारची लक्षणे आढळून येत आहेत. ओमायक्रॉन वेरियंट दरम्यान सर्दी, पडसे, खोकला ही सामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसल्यानंतर कोरोना चाचणी (Corona Virus) त्वरित करून घ्यावी. त्याच वेळी, आता ओमायक्रॉनची वेगवेगळी लक्षणे समोर येत आहेत. Omicron टाळण्यासाठी, त्याच्या लक्षणांबद्दल पूर्णपणे जागरूक असणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यावर वेळीच उपचार करता येतील. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला ओमायक्रॉनच्या इतर काही नवीन लक्षणांबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊया…
ओमायक्रॉनची लागण झालेल्या लोकांमध्ये अनेक प्रकारची लक्षणे दिसून येत आहेत. त्याच वेळी, या विषाणूचे एक नवीन लक्षण म्हणजे नखांच्या रंगात बदल होणे. जर, तुमच्या हाताच्या आणि पायाच्या नखांचा रंग राखाडी, निळा, पिवळा पडला असेल, तर तुम्ही ताबडतोब तुमची कोरोना चाचणी करावी. निळी, राखाडी आणि पिवळी नखे शरीरातील ऑक्सिजनची कमतरता दर्शवतात. कोरोना काळातही रक्तात ऑक्सिजनची कमतरता असते. म्हणून, हे लक्षण दिसून येताच कोरोना चाचणी करून घेणे महत्त्वाचे आहे.
जर तुम्हाला घसा खवखवणे, दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तुम्ही तुमची कोविड चाचणी करून घ्यावी. त्याच वेळी, बरेच लोक याला सामान्य फ्लू समजण्याची चूक करत आहेत. दुसरीकडे, जर तुम्हाला थकवा जाणवत असेल आणि सतत झोप येत असेल, तर हे देखील ओमायक्रॉनचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नये, त्वरित कोरोना चाचणी करावी. जर, तुम्हाला स्नायू दुखीने त्रास होत असेल, तर त्याकडेही दुर्लक्ष करू नका, हे देखील ओमायक्रॉनचे लक्षण असू शकते.