धूम्रपानावर लगाम! ठाकरे सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

    949

    ?‍♂️ धूम्रपानावर लगाम! ठाकरे सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

    ? राज्य सरकारने आरोग्याच्या दृष्टीनं एक निर्णय घेतला आहे. राज्यातील तरुणाई मोठ्या संख्येने या व्यसनाकडे वळत असल्याने राज्य सरकारकडून आदेश जारी करण्यात आला आहे.

    ? काय आहे निर्णय :

    ▪️ सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही दुकानात विडी किंवा सिगारेट सुटी विकता येणार नाही.

    ▪️ सिगारेटचे दुष्परिणाम आणि त्यापासून होणारे नुकसान याची माहिती सिगारेटच्या पाकिटावर छापलेली असते. परंतु सुटय़ा स्वरूपात सिगारेट्सची विक्री होते त्यावेळी कोणतीही सूचना किंवा ‘वैधानिक इशारा’ यावेळी दिली जात नाही.

    ▪️ यापूर्वी राज्य सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती

    ? मात्र, आता या आदेशाची राज्यात कितपत अंमलबजावणी होणार, याबाबत अद्याप साशंकता आहे. कारण, सुटय़ा सिगारेट्स विकत घेणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here