धर्माच्या नावे खरेदीचे फलक; चौघांवर गुन्हा…

    841

    सोलापूर : शहरातील नागरिकांनो तुम्ही’या’ धर्माच्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करा, इतरांवर आर्थिक बहिष्कार टाका, असे आवाहन करणारे फलक घेऊन फिरणाऱ्या युवकांचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर नुकताच व्हायरल झाला. या प्रकरणी पोलिसांनी चार तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

    काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या पार्श्वभूमीवर दोन समाजातील तेढवाढविण्याच्या पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या होत्या. या दरम्यान, शहरातील नवी पेठ परिसरातील एक व्हिडीओ व्हायरल झाला. हे युवक सायंकाळी हातात वेगवेगळ्या प्रकारचा मजकूर लिहिलेले फलक घेऊन थांबले आहेत. त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या. तुम्ही धर्म विचारून खरेदी करा. जात नव्हे धर्म विचारला, अशा आशयाचा मजकूर या फलकावर दिसत आहे.

    “नवी पेठेतील व्हिडीओ आमच्यापर्यंत पोहोचला आहे. सार्वजनिक शांततेला गालबोट लागणार नाही याची काळी सर्वांनी घेतली पाहिजे. आपलं शहर गुण्यागोविंदाने नांदावे यासाठी सर्वांनी यंत्रणेला सहकार्य करावे.

    – एम. राज कुमार, पोलिस आयुक्त.

    मुलांच्या वयाची पडताळणी

    एकूण चारजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी दोन जणांची चौकशी झाली आहे. उर्वरित दोन जणांना पोलिस उपायुक्तांसमोर मंगळवारी हजर करण्यात येणार आहे. मुलांच्या वयाची पडताळणी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here