धनंजय जाधवांनी पूजा मोरेसोबत रडण्यापेक्षा भाजपचे दहा नगरसेवक पाडण्याची ताकद ठेवली पाहिजे

    47

    पुणे महापालिकेसाठी भाजपकडून अर्ज भरलेल्या पूजा मोरे-जाधव यांना उमेदवारी अर्ज माघार घेण्याची नामुष्की ओढवली. भाजप समर्थकांनी आणि मराठा समाजाविरोधातील लोकांनीच पूजा मोरे यांना ट्रोल केल्यानेच अर्ज मागे घेतला. प्रा. लक्ष्मण हाके यांनी पूजा मोरेवर टीका करताना आपली लायकी बघावी. विचारांशी तडजोड करून पूजा मोरेंनी तिकीट मिळवलं. भाजपची रणनीर्ती खूप वेगळी आहे, त्यांच्यावर निष्ठावंतांनी विश्वास ठेवण्याची गरज नाही. धनंजय जाधव यांनी रडण्याऐवजी लढत त्याच वार्डामधील भाजपची दहा लोक पाडण्याची ताकद धनंजय जाधव यांनी ठेवली पाहिजे, अशी संतप्त प्रतक्रिया बीडमधील मराठा समाजाने दिली. पूजा मोरे मुळच्या बीड तालुक्याती गेवराईच्या आहेत. भाजपच्या काही लोकांनी आणि मराठा विरोधकांडून पूजा मोरे यांना ट्रोल केलं गेलं. त्यामुळे त्यांना आपला अर्ज मागे घ्यावा लागला, पूजा मोरे आक्रमकआणि अभ्यासू नेतृत्व आहे आणि त्या कमी वयाच्या आहेत. म्हणून त्यांना पुणे महापालिकेच्या सभागृहात काम करण्याची संधी मिळायला पाहिजे होती. याचा उपयोग वंचित शोषितांचा आवाज म्हणून त्यांनी काम केले असते, असेही त्यांनी नमूद केले. लक्ष्मण हाके यांनी टीका करण्याआधी आपली लायकी बघावी त्यांना विधानसभेत फक्त 253 मतदान पडले होते हे हाके विसरले आहेत. पूजा मोरे या पंचायत समिती सदस्य राहिलेल्या आहेत. पूजा मोरे यांनी विधानसभा निवडणूक लढवली त्याना 2000 पेक्षा अधिक मतं पडली होती. लक्ष्मण हाके उंटाचा मुका घ्यायला जाऊ नका महागात पडेल तुम्ही तुमची लायकी बघून काम करा, पाकीट घेऊन नको तिथं तोंड घालू नका, असा इशाराही दिला.હ શ્રાદ महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा तमाशा केला गेला पूजा मौरे यांनी पहलगाममध्ये सर्वधर्मसमभाव जपण्यासाठी केलेले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने ट्रोल करून दाखवले गेले. भाजप विरोधात कोणी बोललं तर आम्ही काय काय करतो हे दाखवण्यासाठी अर्ज मागे घ्यायला लावला गेला. आम्ही मराठा सेवक म्हणून भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध करतो. महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा तमाशा केला गेला आहे. पूजा मोरे या पुरोगामी विचाराच्या होत्या. मात्र, त्यांनी भाजपचे उमेदवारी मिळवली आणि त्यामुळेच मूळचे भाजपमधील काम करणारे दुखावले गेले असतील त्याचाच परिणाम त्यांना ट्रॉल करण्यात् आले, असेही त्यांनी नमूद केले. धनंजय जाधव हे मराठ्यांचे पुढारी आहेत संभाजीराजे भोसले यांचे निकटवर्तीय आहेत. असे असताना त्यांनी रडण्याऐवजी लढत त्याच वार्डामधील भाजपचा नगरसेवकाच्या पराजयासाठी अपक्ष उभारलं पाहिजे, भाजपची दहा लोक पाडण्याची ताकद धनंजय जाधव आ आणि ठेवली पाहिजे, अशीही प्रतिक्रिया दिली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here