धक्कादायक ! 45 वर्षीय नराधमाची 16 वर्षाच्या मुलीकडे लग्नाची मागणी; लग्न केले नाहीतर तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची दिली धमकी

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात एका 45 वर्षाच्या व्यक्तीने 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला तु माझ्याशी लग्न कर नाहीतर घरात घुसून तुझ्या तोंडावर अ‍ॅसिड फेकीन अशी धमकी (acid attack) दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जून 2017 ते 27 ऑगस्ट 2021 या कालावधीत येरवडा येथील गाडीतळ (gadital hadapsar) परिसरात घडला आहे. याप्रकरणी 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada police station) फिर्याद दिली आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी (Pune Crime) दिली आहे.

मोहम्मद हुसेन खान (वय-45 रा. गाडीतळ, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद खान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने परिसरात राहणाऱ्या एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला (minor girl) मागील तीन महिन्यापासून मानसिक त्रास दिला. तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आरोपीने तिला येता जाता ‘आय लव्ह यू’ म्हणून भिती दाखवली. तसेच तुझे 18 वय होईपर्यंत मी वाट वाहिन. तू माझ्याशीच लग्न कर अशी धमकी दिली. लग्न केले नाही तर घरात घुसून मारेन, तुझ्या तोंडावर अ‍ॅसिड फेकेन अशी धकमी दिली.

आरोपी एवढ्यावर थांबला नाही तर त्याने मुलाचा पाठलाग करुन लग्नासाठी तगादा लावून लग्न केले नाहीतर जाळून मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली.
तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर 354, 354ड, 506 आणि पोक्सो (Pocso Act) 12 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर (PSI Swati Thakur) तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here