- बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक के.के. यांचं वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचे प्राथमिक माहितीत समोर आलं आहे.
- के.के. कोलकाता येथे एका कार्यक्रमासाठी गेला होता. यावेळी चालू कार्यक्रमात छातीत कळ आल्याने त्यांना लगेच दवाखान्यात हलवण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात त्यांनी रात्री १०.३० वाजता अखेरचा श्वास घेतला.
- के.के. यांच खरं नाव कृष्णकुमार कुंनाथ हे होतं. दिल्लीतील एका सर्वसाधारण कुटुंबात त्यांच्या जन्म झाला होता. मात्र आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर त्यांनी आपली ओळख प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचवली. के.के. यांनी गायलेलं प्रत्येक गाणं हे प्रेक्षकांसाठी स्पेशल ठरलं.