धक्कादायक ! तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल :पोलीस कर्मचाऱ्यावरच गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल

नगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यातील कर्मचारी शकील सय्यद याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी नऊ तारखेला गुन्हा दाखल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असून 4 ऑक्टोबर रोजी रात्री पावणे आठ ते पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास विळद घाट परिसरातील निंबळक बायपास परिसरात ही घटना घडल्याचे पिडीतेचे म्हणणे आहे. पीडित तरुणीने या प्रकरणात फिर्याद दिली आहे.तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, शकील सय्यद याने सदर तरुणीस स्विफ्ट कारमधून घेऊन जात असताना तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. त्यावेळी पीडित तरुणीने त्यास विरोध केला आणि तरुणीने गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली त्यावर शकील सय्यद याने, ‘ मी पोलीस आहे. माझे मोठ्या मोठ्या गुन्हेगारांशी संबंध आहे तुला कापून फेकून देईन ,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तरुणीच्या फिर्यादीनुसार शकील सय्यद याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे हे करत आहेत. नगर शहरात पोलीस कर्मचाऱ्यावरच अशा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून यावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे नगरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here