धक्कादायक | औरंगाबादेत कुरिअरने आला शस्त्रसाठा, तब्बल 37 तलवारी, एक कुकरी जप्त, पोलिसांचा तपास सुरू

459

औरंगाबाद | औरंगाबाद शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरात एका कुरिअरद्वारे (Swords) मोठा शस्त्रसाठा दाखल झाला आहे. यात तलवारी आणि कुकरीचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तलवारी आणि शस्त्र कुणी मागवली, कुणी पाठवली, याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही. मात्र अचानक एवढा साठा कुरिअरच्या माध्यमातून पाठवण्यात आल्यामुळे पोलीस (Aurangabad police) यंत्रणा हादरली आहे. शहरात हा शस्त्रसाठा (Arms) आल्याची माहिती कळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तो जप्त केला आहे. यामागे कुणाचा हात आहे, याचा तपास सध्या पोलीस घेत आहेत.

शहरातील क्रांती चौक पोलिसांनी सदर शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, DTDC कुरिअरद्वारे सदर शस्त्रसाठा शहरात पोहोचला. या पार्सलवर संशय आल्यानंतर सदर माहिती पोलिसांना देण्यात आली. क्रांती चौक पोलिसांनी सदर पार्सल ताब्यात घेतल्यानंतर त्यातील शस्त्रसाठा जप्त केला आहे.

दरम्यान, पवित्र रमजानचा महिना सुरु होण्यास तीन दिवस शिल्लक आहेत तर येत्या 2 एप्रिल रोजी गुढीपाडवादेखील आहे. शहरातील सण उत्सवांचे वातावरण पाहता शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या पार्सलबाबत क्रांती चौक पोलिसांमार्फत अधिक तपास केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here