घटना जळगाव जिल्ह्यात समोर आलेली
ग्रामीण भागातील युवकांना तसेच आर्थिक परिस्थिती खराब असलेल्या युवकांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झालेले आहे याचा फायदा घेत महाराष्ट्रात मॅरेज रॅकेट नावाचा गुन्हेगारीचा नवीन पॅटर्न सुरू झाला आहे अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात समोर आलेली असून पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत .
जळगाव येथील एका तरुणीचा तालुक्यातील एका तरुणाशी सहा तारखेला विवाह सोहळा संपन्न झाला होता त्यावेळी मध्यस्थी करणाऱ्या एका महिलेने दोन लाख रुपयांची मागणी करून ते घेतले तर तरुणाने विवाह होत नसल्याने गावात आपल्या मित्रांना देखील मुलगी विकत आणून विवाह करत असल्याचे लपून ठेवले मात्र मुलीकडे फक्त चारच नातेवाईक लग्नाला आले आणि ते देखील पैसे मागत आहेत अशी शंका त्यांना आली त्यामुळे त्यांच्या मनात संशय जागृत झाला.
अवघ्या आठवड्यापूर्वी औरंगाबाद येथे दौलताबाद किल्ल्यावर फिरायला जाणारी एक नवविवाहिता पळून गेली होती. ती तरुणी आणि ही तरुणी एकच असल्याचे काही तरुणांच्या लक्षात आले आणि त्यांनी नवरी मुली आणि तिच्या नातेवाईकांना थांबून धरले.
त्यानंतर आपली चोरी उघडकीला आल्याचे समजताच तरुणीने या प्रकाराची कबुली दिली असून नवरदेवाच्या पालकांनी मात्र त्यांना दिलेले दोन लाख रुपये परत घेतले आहेत.
नवरी मुलीच्या नातेवाईकांना धरून ठेवण्यात आले त्यावेळी या प्रकारात नवरी मुलीची देखील फसवणूक केले जात असल्याचे समोर आले असून नवरीला केवळ पाच ते दहा हजार रुपये देऊन लग्नासाठी उभे करण्यात येते मात्र त्यानंतर आलेली रक्कम ही इतर लोक वाटून घेतात आणि नवीन सावज शोधून देण्याचे देखील काम ते करतात असे दिसून आले आहे.






