
कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील संजयनगर काटवन खंडोबा व बुरुडगाव रोड परीसरात राहणारे व शहरात चो-या करून हत्यारे बाळगून करुन दहशत निर्माण करणारे १) विकास दिलीप खरपुडे, वय २५ वर्ष, रा बुरुडगाव रोड, अहमदनगर २) सुनिलसिंग जितसींग जुन्नी, वय २६ वर्ष, रा काटवन खंडोबा संजयनगर, अहमदनगर यांचा हद्दपारीचा प्रस्ताव कोतवाली पोलीस स्टेशन कडुन दाखल करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांनी सदर हद्दपार प्रस्तावांची चौकशी करून दोन्ही आरोपींना हद्दपार करण्याबाबत शिफारस केली होती त्यावरून सुनावणी घेऊन मा. श्रीनिवास अर्जुन, उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग, अहमदनगर यांनी सदर गुन्हेगारांना अहमदनगर जिल्ह्यातुन २ वर्षा करीता हद्दपारीचे आदेश पारित केले. पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव यांचे आदेशान्वये गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी तात्काळ सदर आरोपीना ताब्यात घेवुन त्याच्यावर आज दि २०/०४/२०२३ रोजी हद्दपारीची कारवाई केली आहे. सदर हद्दपार इसमावर या पुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
विकास दिलीप खरपुडे –
१) कोतवाली पोस्टे गुरनं । ४७/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे
२) गुरनं ४८/२०२२ भादवि ३७९ प्रमाणे
३) गुरनं ८७२ / २०२१ भादवि ३७९ प्रमाणे
४) गुरनं ६६ / २०२० भादवि १६० प्रमाणे
५) तोपखाना पोस्टे गुरनं १५३/२०२२ भादवि ३७९ प्रमाणे
६) शेवगाव पोस्टे गुरनं ९२ / २०२१ आर्म अॅक्ट ३/२५, ७/२५ महा पोकाक १२४
सुनीलसिंग जितसिंग जुन्नी –
१) कोतवाली पोस्टे गुरनं ५०१/२०१७ भादवि ३७९, ३४ प्रमाणे
२) गुरनं ६८७/२०२१ भादवि ३५४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे
३) गुरनं १९२ / २०२२ भादवि ३९९, ४०२ सह आर्म अॅक्ट ३/२५, ४/२७, ७ प्रमाणे
४) MIDC पोस्टे नगर गुरनं ३८२/२०१८ भादवि ३९९, ४०२ सह आर्म अॅक्ट ४/२५
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस जवान तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, मुकुंद दुधाळ, कवीता गडाख, ए पी इनामदार, पोकों सोमनाथ राऊत, पोकॉ अमोल गाढे, पोकों सुजय हिवाळे, पोकों सागर मिसाळ, पोको अतुल काजळे अभय कदम राहुल मासाळकर यांच्या पथकाने केली आहे.
सर,
जय हिंद..
अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील गंज बाजार येथील व्यापारी यांची मीटिंग घेतली.
व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास देऊन कोणी गुंड प्रवृत्तीचे लोक जबरदस्तीने वर्गणी मागत असल्यास तक्रार द्यावी कारवाई करू.
तसेच आपल्या बाजारपेठेतील वाद विवाद झाल्यास आपण स्वतः वाद न वाढवता पोलीस स्टेशन किंवा आमच्याशी संपर्क साधावा असे मार्गदर्शन केले.
कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवणे, यासोबतच ट्रॅफिक अडचण, मुलीं-महिलांची छेडछाड संदर्भात विविध विषयावर चर्चा करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.
सदर मीटिंग करिता 35 ते 40 व्यापारी उपस्थितीत होते.
मा. सविनय सादर,
चंद्रशेखर यादव,
पोलीस निरीक्षक,
कोतवाली पोलीस स्टेशन.