दोन दिवसांपासुन शहर पाण्याचा विज लाभ खंडित पाणी होत होते शहर उपनगरांचा लाभ विस्कसह एकत्र.

    201

    दोन दिवसांपासुन शहर पाणी योजनेचा विज पुरवठा खंडित होत असल्याने शहरासह उपनगरांचा पाणी पुरवठा विस्कळीत होत असले बाबत.

    शनिवार दि.०८/०४/२०२३ रोजी सायंकाळी ७.१५ वाजलेच्या सुमारास शहर पाणी पुरवठा योजनेच्या मुळनगर व विळद पंपीग स्टेशन परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने विज पुरवठा खंडित झाल्याने पाणी उपसा बंद पडलेला आहे. .

    तसेच काल दि.७/०४/२०२३ रोजी वादळी वाऱ्यासह पावसामुळे सायंकाळी वारंवार विज पुरवठा खंडीत झालेला होता.

    त्यामुळे आज सायंकाळी सुरू असलेले काही उपनगरांचे पाणी वाटप बंद पडलेले आहे.

    तथापी शनिवार दिनांक ०८/०४/२०२३ रोजीचे रोटेशन नुसार पाणी पुरवठा न झालेल्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदा . सिद्धार्थ नगर, लाल टाकी, दिल्लीगेट, नालेगांव, तोफखाना, चितळेरोड, आनंदी बाजार, माणिक चोक, कापडबाजार, नवीपेठ, जुने मनपा कार्यलय परिसर इ . भागास रविवारी नेहमीच्या वेळेत पाणी वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

    तसेच रविवार दि.०९/०४/२०२३ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदा . झेंडी गेट’ रामचंद्र खुंट’ हातमपुरा’ रामचंद्र खुंट’ कोठला’, सर्जेपुरा, कलेक्टर कचेरी परिसर, बंगाल चौकी, आडते बाजार, दाळमंडई, माळीवाडा’, इत्यादीसह सावेडी उपनगरातील उंच टाकीवरुन पाणी वाटपाच्या गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलनी, टि.व्ही. सेंटर हाडको इ . भागास पाणी पुरवठा होणार नाही. या भागास सोमवार दि १०/०४/२०२३ रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल.

    तरी शहर पाणी पुरवठा योजनेच्या परिसरात दोन दिवसां पासुन वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याने व त्यामुळे विज पुरवठा वारंवार खंडित होऊन नियमित पाणी उपशावर परिणाम होत असल्याने निर्माण झालेली परिस्थीती विचारात घेऊन नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर कारकस रिने करावा व महानगर पालिकेस सहकार्य करावे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here