देशात जानेवारीत येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, एक्सपर्ट कमिटीनं सांगितलं कारण

750

Covid Third Wave in India: देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांत झपाट्यानं वाढ होऊ लागल्यानं आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली जातेय. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 400 हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आलीय. दरम्यान, ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग रोखता येणार नसून देशात जानेवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. केरळमध्ये कोरोना संसर्गावर स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीनं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमागचं कारणही सांगितलंय. यावेळी दुसऱ्या लाटेप्रमाणे गंभीर आजारी रुग्णांची संख्या नसेल. परंतु, आपण आधीच सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असं समितीचे डॉक्टर अनिस यांनी म्हटलंय. 

डॉक्टर अनिस म्हणाले की, “जागतिक ट्रेंडवरून असं दिसतंय की, येत्या दोन- तीन आठवड्यात कोरोना संक्रमतांची संख्या एक हजारावर पोहचण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन महिन्यात बाधितांच्या संख्या 10 लाखांवर पोहचण्याची शक्यता आहे. तर, ओमायक्रॉन हे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे प्रमुख कारण ठरू शकते.” कोरोनाची तिसरी लाट थांबवण्यासाठी आम्हाला एक महिन्यापेक्षा जास्त वेळ मिळू शकणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

देशात येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना निर्बंधांचं पालन करणं आवश्यक आहे. याशिवाय आपल्याकडं कोणताही पर्याय नाही. ज्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असाही इशारा समितीनं दिलाय. 

महत्वाचं म्हणजे, भारतात ओमायक्रॉनचे एकूण 415 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 115 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत  महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक 108 रुग्ण आढळले. याशिवाय, दिल्लीत 79, गुजरातमध्ये 43, तेलंगणात 38, केरळमध्ये 37, तामिळनाडूमध्ये 34 आणि कर्नाटकमध्ये 31 रुग्ण आढळून आले आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here