देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे ६३,५०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
कालच्या तुलनेत मागील २४ तासात पुन्हा एकदा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढली आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासात ७३० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान देशात आता ८ लाख २६ हजार सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहे..
आतापर्यंत देशात एकूण १ लाख १० हजाराहून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
देशातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ७२ लाखांच्या देखील पुढे गेलेला आहे.