
पंतप्रधान नरेंद्र मोदी रामेश्वरममध्ये भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजचं उद्घाटन करणार आहेत. व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज अर्थात पंबन पूल हा वारसा आणि नवीन तंत्रज्ञानाचा उत्तम मिलाफ असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. या रामनवमीला भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सागरी सेतूचे उद्घाटन होणार आहे.
तसंच रामेश्वरम-तांबरम (चेन्नई) नवीन रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी तटरक्षक दलाच्या जहाजालाही हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. नवीन पंबन पूल रेल्वे विकास निगम लिमिटेडने (RVNL) बांधला आहे. हा पूल 550 कोटींहून अधिक खर्च करून बांधण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी 2019 मध्ये नवीन पंबन पुलाची पायाभरणी केली होती. त्यानंतर आता 5 वर्षात तो समुद्रावर उभारून पूर्ण झाला आहे.
व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज अर्थात पंबन पूल 2.08 किलोमीटर लांबीचा आहे. यात 18.3 मीटरचे 99 स्पॅन आणि 72.5 मीटरचे उभे लिफ्ट स्पॅन आहेत. यामुळे मोठी जहाजे सहजतेने जाऊ शकतील. त्याच्या संरचनेत 333 पाइल आहेत. ते 2.08 किलोमीटर लांबीचा आहे. यात 18.3 मीटरचे 99 स्पॅन आणि 72.5 मीटरचे उभे लिफ्ट स्पॅन आहेत. यामुळे मोठी जहाजे सहजतेने जाऊ शकतील. त्याच्या संरचनेत 333 पाइल आहेत. ते इतके मजबूत बांधले गेले आहे