देशदेशात सध्या बुली बाई अ‍ॅप (Bulli Bai App) मुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे

774
  • प्रकरण १८ वर्षांची मुलगी मुख्य आरोपी ?
  • देशात सध्या बुली बाई अ‍ॅप (Bulli Bai App) मुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या अ‍ॅपवर समाजामध्ये मुस्लिम महिलांना बदनाम करण्याच्या उद्देशाने त्यांच्या लिलावं करण्याचा धक्कादायक आणि गंभीर स्वरूपाचे आरोप लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात देशामधील विविध पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदविण्यात आले आहे. देशात हे घटना समोर येताच सोशल मीडियासह अनेक राजकीय नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
  • तर दुसरीकडे आता या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर युनिटने एका २१ वर्षीय तरुणाला बंगळुरुमधून अटक केली आहे. विशाल कुमार झा असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर उत्तराखंडमधून १८ वर्षीय तरूणीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ती फक्त १२ वी पास आहे. ती या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याची माहिती देखील समोर आली आहे. तिला मुंबई पोलिसांनी उत्तराखंडमधील रुद्रपूर येथून अटक केली आहे .
  • तरुणीची नेमकी काय भूमिका होती यासंबंधी पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नसली तरी ती मुख्य आरोपी असल्याचा संशय आहे. दरम्यान उत्तराखंड पोलिसांनी आपण याप्रकरणी चौकशी केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. फक्त मुंबई पोलिसांकडून तरुणीची चौकशी करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here