अ हमदनगर: दिनांक : 14 जानेवारी
मागील महापालिका पोटनिवडणुकीच्या काळात केडगावमध्ये हे हत्याकांड घडले होते. ७ एप्रिल २०१८ रोजी शिवसेनेचे पदाधिकारी वसंत ठुबे व संजय कोतकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपींकडून कोतकर हिच्याबद्दल माहिती तपास करणाऱ्या सीआयडीच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे सीआयडीने कोतकरचेही नाव या गुन्ह्यात नोंदविले. तेव्हापासून कोतकर फरारी असून आता अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज करण्यात आला होता.
सुरुवातीला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता.त्यानंतरया अर्जावर जिल्हा न्यायाधीश अमित शेटे यांच्यासमोर सुनावणी झाली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कोतकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
केडगाव येथे दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती या हत्याकांडात सुवर्णा कोतकर यांचे नाव पोलिसांच्या तपासात पुढे आले होते सदर घटनेनंतर सुवर्णा कोतकर या फरार होत्या,
आज जिल्हा सत्र न्यायालय मध्ये माननिय जिल्हा न्यायाधीश कुर्तडीकर यांनी सुवर्णा कोतकर यांना अटक जामीन मंजूर केला आहे त्यांच्या वतीने अँड व्ही बी म्हसे. पाटील अॅड महेश तवले संजय दुशिंग सागर वाव्हळ संजय वाल्हेकर यांनी काम पाहिले.